पुष्कळ अजुनी उणा

पुष्कळ अजुनी उणा

 

पुष्कळ अजुनी उणा,

प्रभू मी पुष्कळ अजुनी उणा रे II

खंडीतुन रति नाही फेडिले

बंधुभगिनिंच्या ऋणा रे II 1 II

तुझा ऋणी तर सदाच राहिन

अगा पतितपावना रे II 2 II

किती लाजतो मनांत ठाऊक

तुजवाचुन हे कुणा रे II 3 II

असे करावे, तसे करावे

वायां मम वल्गना रे II 4 II

टाकाऊ मी परंतु, सदया

आवडलो त्वन्मना रे II 5 II

जसा पाहिजे तुला तसा मी

करू कसा आपणा रे II 6 II

ख्रिस्ता, ख्रिस्ता, घे घे अवघा

हा माझा मीपणा रे II 7 II

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.